केंद्र आणि राज्य शासन एकत्रितपणे राज्यातील सुरक्षेसाठी काम करणार !
नवी देहली – खलिस्तानवादी वारिस पंजाब दे (पंजाबचे वासरदार) या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याच्यावर आक्रमण करून पंजाबमध्ये हिंसाचार घडवून आणण्याचा कट अन्य खलिस्तान्यांनी रचला आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या संदर्भात राज्य आणि केंद्र शासन यांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.
खुफिया एजेंसियों को ऐसे इनपुट मिले हैं कि कुछ एंटी नेशनल एलीमेंट अमृतपाल पर हमला कर सकते हैं #AmritpalSingh #Punjab
(@arvindojha) https://t.co/io0Jkz1O7B— AajTak (@aajtak) March 2, 2023
१. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीत बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी संघटना सिख फॉर जस्टिस भारतात होणार्या जी-२० शिखर संमेलनापूर्वी घातपात करण्याची धमकी देत आहे.
(सौजन्य : Aaj Tak)
२. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देहली येथे भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी चर्चा केली. यात दोघांनीही राज्याच्या सुरक्षेसाठी एकत्रित काम करण्याचे मान्य केले.