देहलीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ

मनीष सिसोदिया

नवी देहली – देहलीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली. वादग्रस्त मद्य धोरण राबवल्याच्या प्रकरणात मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. याची सुनावणी आता १० मार्चला होणार आहे.