देहलीतील एका महिलेच्या धर्मांतराच्या बातम्या संकेतस्थळांवरून हटवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, न्यूज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मानक प्राधिकरण यांनाही नोटिसा ! ‘बातम्या काढण्यात आल्या नाही, तर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणीही न्यायालयाने दिली आहे.

अंदमान, बंगाल आणि ओडिशात ‘मोचा’ चक्रीवादळाची चेतावणी !

भारतीय हवामान खात्याने अंदमान-निकोबार, बंगाल आणि ओडिशा येथे ‘मोचा’ नावाच्या चक्रीवादळाची चेतावणी दिली आहे. मोचा चक्रीवादळामुळे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक झाडे उन्मळून पडली.

महाराष्ट्रातील २ बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार

महाराष्ट्रातील ‘मुंबई बंदर प्राधिकरण’ आणि ‘जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण’ या दोन बंदरांना वर्ष २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट कार्याविषयी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी १० मे या दिवशी ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्काराने सन्मानित केले. येथील इंडिया इंटरनॅशनल केंद्रामध्ये केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

‘द केरल स्टोरी’ चित्रपट एकाच वेळी ४० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित !

भारतात आतापर्यंत ६० लाखांहून अधिक लोकांनी ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पाहिला आहे. आज एक नवीन अध्याय चालू होत आहे. ‘द केरल स्टोरी’ ४० हून अधिक देशांमध्ये एकत्र प्रदर्शित करत आहोत.

देशभरात चित्रपट प्रदर्शित झाला असतांना बंगालमध्ये का नाही ? – सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

हिंदूंच्या देशांत हिंदूंवर होणारे अत्याचार न रोखता हे अत्याचार जगासमोर आणणार्‍या चित्रपटावरच बंदी घालणार्‍या बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडू सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् या पक्षांना हिंदूंनी राजकीय धडा शिकवणे आवश्यक !

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांचेच सरकार कायम !

उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळेच राज्यातील सरकार कोसळल्यामुळे राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला न्यायालयाकडून मान्यता दर्शवण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

१० वर्षांनी भारत जागतिक महसत्ता असेल ! – योगऋषी रामदेवबाबा

योग हा राष्ट्रातच नव्हे, तर जगभरात जाईल आणि योगधर्मासमवेतच सनातन धर्माची प्रतिष्ठा संपूर्ण जगात वाढेल. माता-भगिनींना आवाहन करतो की, प्रतिकुल परिस्थितीत, आपत्ती किंवा गंभीर संकटात स्वधर्मापासून डगमगू नका, संयम ठेवा, योग आत्मसात करा, सर्व अडथळे दूर होतील.

तीन राज्यांचा समलिंगी विवाहाला विरोध ! – केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. एस्.आर्. भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी.एस्. नरसिंह यांच्या घटनापिठासमोर या खटल्याची सुनावणी चालू आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता !

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बाहेर पडलेल्या १६ आमदारांच्या पात्र-अपात्रता यांविषयी येत्या २ दिवसांत सर्वाेच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय ११ मे या दिवशी देऊ, असे स्‍पष्‍ट केले आहे.

‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटाच्या निर्मात्याला ‘आसाराम बापू ट्रस्ट’कडून नोटीस

चित्रपटातून पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांचा अवमान केल्याचा दावा