१० वर्षांनी भारत जागतिक महसत्ता असेल ! – योगऋषी रामदेवबाबा

योगऋषी रामदेवबाबा

नवी देहली – पुढील १० वर्षांनी भारत संपूर्ण जगाची सर्वांत मोठी आर्थिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सर्वांत मोठी सामरिक महासत्ता असेल, असे विधान  योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. योगऋषी रामदेवबाबा यांच्या नेतृत्वाखाली आणि पतंजलि विद्यापीठ, भारत स्वाभिमान (महिला शाखा) आणि डब्ल्यू -२०, जी-२० च्या भागीदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये महिलांची विशाल परिषद आयोजित करण्यात आली होती. यात विविध राज्यांतील अनुमाने ५ सहस्र ५०० महिला सहभागी झाल्या होत्या. त्या वेळी योगऋषी रामदेवबाबा बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘योग हा राष्ट्रातच नव्हे, तर जगभरात जाईल आणि योगधर्मासमवेतच सनातन धर्माची प्रतिष्ठा संपूर्ण जगात वाढेल. माता-भगिनींना आवाहन करतो की, प्रतिकुल परिस्थितीत, आपत्ती किंवा गंभीर संकटात स्वधर्मापासून डगमगू नका, संयम ठेवा, योग आत्मसात करा, सर्व अडथळे दूर होतील.’’