देहली येथून १ सहस्र २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त : दोघा अफगाणी नागरिकांना अटक  

देहली पोलिसांच्या विशेष शाखेने दोघा अफगाणी नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून ३१२.५ किलोग्राम मेथामफेटामाईन आणि १० किलोग्राम हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

देहलीतील ‘राजपथ’चे नाव आता ‘कर्तव्यपथ’ !

देहलीतील प्रसिद्ध ‘राजपथ’चे नाव पालटून त्याचे ‘कर्तव्यपथ’ असे नामकरण केले जाणार आहे. इंडिया गेटवरील नेताजींचा पुतळा ते राष्ट्रपती भवन हा रस्ता ‘राजपथ’ या नावाने ओळखला जातो.

‘आप’चे अरविंद केजरीवाल : स्वराज ते मद्यघोटाळा मॉडेलपर्यंत !

काही दिवसांपूर्वी देहलीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांची मद्यघोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) चौकशी केली.

बिहारमध्ये सरकारी शाळेत ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; देहलीत तिसरीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

बिहार आणि देहली येथे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या घटना समोर आल्या आहेत. बिहारच्या बेगुसरायमध्ये इयत्ता दुसरीच्या ७ वर्षांच्या मुलीवर शाळेतील सफाई कामगाराने बलात्कार केला.

पीडितांसाठी लढणार्‍या खासगी संस्थेला केंद्र सरकारकडे दाद मागण्याची सर्वोच्च न्यायालयाची अनुमती

एका खासगी संस्थेला वर्ष १९९० मध्ये जम्मू-कश्मीरमध्ये हिंदु आणि शीख यांच्या झालेल्या हत्यांच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडे देण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवा !

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतःहून हे शब्द हटवले पाहिजेत, असेच राट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना वाटते !

एन्.आय.ए.कडून दाऊद इब्राहिम याची माहिती देणार्‍याला २५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित

दाऊद इब्राहिम पाकमध्ये लपला आहे, याचे असंख्य पुरावे आणि माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांकडे उपलब्ध आहे. असे असतांना पाकमध्ये घुसून त्याला फरफटत भारतात आणण्याऐवजी अशा प्रकारे बक्षीस घोषित करण्याची वेळ भारतीय सुरक्षा यंत्रणांवर येणे, हे लज्जास्पद होय !

पाकिस्तानी सैन्याकडून तरुणींच्या माध्यमांतून भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी विशेष तुकडी !

पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैनिकांना महिलांच्या माध्यमांतून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न करत आहे. यात तिला यशही मिळाल्याने अनेक घटनांतून उघडकीस आले आहे.

शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाची कर्नाटक सरकारला नोटीस

कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर घालण्यात आलेल्या बंदीला कर्नाटक उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. या आदेशाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

राजधानी देहली महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित शहर ! – नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नवीन अहवालानुसार राजधानी देहली शहर महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित शहर असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी देहलीत प्रतिदिन २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले, त्यांपैकी अनेक आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत.