राजधानी देहली महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित शहर ! – नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल

हे भारतियांना लज्जास्पद !

नवी देहली – नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नवीन अहवालानुसार राजधानी देहली शहर महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित शहर असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी देहलीत प्रतिदिन २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले, त्यांपैकी अनेक आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत.

१. एन्.सी.आर्.बी.च्या आकडेवारीनुसार देहलीमध्ये वर्ष २०२१ मध्ये १३ सहस्र ८९२ महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ही संख्या २०२० च्या तुलनेत ४० टक्क्यांनी  अधिक होती. वर्ष २०२० मध्ये हा आकडा ९ सहस्र ७८२ वर पोचला होता.

२. या अहवालानुसार देशातील सर्व १९ महानगरांपैकी ३२.२० टक्के महिलांवरील गुन्हे एकट्या देहलीत घडले आहेत.

३. देहलीमध्ये वर्ष २०२१ मध्ये महिलांच्या अपहरणाच्या ३ सहस्र ९४८, पतीकडून अमानुषत वागणूक दिल्याचे ४ सहस्र ६७४ आणि मुलींवर बलात्काराचे ८३३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

४. देहलीनंतर मुंबईचा क्रमांक येतो. येथे महिलांच्या अत्याचारांच्या ५ सहस्र ५४३ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

५. तिसर्‍या क्रमांकावर बेंगळुरू आहे. येथे ३ सहस्र १२७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. १९ महानगरांमधील महिलांवरील गुन्ह्यांमध्ये मुंबई आणि बेंगळुरू यांचा भाग अनुक्रमे १२.७६ टक्के आणि ७.२ टक्के आहे.