शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शिवसेनेचे लोकप्रिय नेते माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोवा येथे निधन झाले.

सावंतवाडीत प्राणघातक आक्रमण झालेल्या टेम्पोचालकाचे निधन

जिमखाना मैदानानजिक लुटण्याच्या उद्देशाने टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) त्यांच्यावर दोघांनी चाकूने प्राणघातक आक्रमण केले होते. यामध्ये ते गंभीर घायाळ झाल्याने रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले.

निधन वार्ता

सनातन संस्थेच्या साधिका रंजना नामदेव शिंदे (वय ४८ वर्षे) यांचे १५ डिसेंबर या दिवशी कर्करोगाच्या व्याधीमुळे निधन झाले.

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचेही कोरोना संसर्गाने निधन

कोविड सेंटरमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने मृत झालेले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचेही कोरोना संसर्गाने निधन झाले आहे. पत्रकार रायकर यांचे निधन झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेले साहाय्य अद्यापही मिळाले नसल्याचे सांगत मराठी पत्रकार परिषदेने संताप व्यक्त केला आहे.

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते यांना पुत्रशोक

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संजय पडते आणि कुडाळच्या माजी सरपंच सौ. पडते यांचा मुलगा देवेंद्र पडते (वय २८ वर्षे) यांचे गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असतांना ९ डिसेंबरला निधन झाले.

सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू प्रमोद शिंदे यांचे निधन

सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू प्रमोद शिंदे (वय ६५ वर्षे, रहाणार कळवा, जिल्हा ठाणे) यांचे ८ डिसेंबर या दिवशी दुपारी ३.५० वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

अभ्दिमंडी (जिल्हा संभाजीनगर) येथील गुरुमूर्ती पू. आप्पा लिंभारे (वय ७५ वर्षे) यांचा देहत्याग !

येथील शिवभक्त गुरुमूर्ती पू. आप्पा लिंभारे (वय ७५ वर्षे) यांनी ३ डिसेंबर या दिवशी देहत्याग केला. सनातन परिवार लिंभारे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. पू. आप्पा लिंभारे यांना १२ वर्षांपूर्वी दत्तगुरूंनी दृष्टांत दिला.

तळोजा येथे आग विझवतांना अग्नीशमन दलातील जवानाचा गुदमरून मृत्यू

आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्नीशमन दलाच्या बाळू देशमुख जवानाचा गुदमरून मृत्यू झाला.

निधन वार्ता

सनातन संस्थेच्या क्रियाशील साधिका सौ. आरती कांडलकर यांचे सासरे शरद माधव कांडलकर (वय ८० वर्षे) यांचे २८ नोव्हेंबर या दिवशी प्रदीर्घ आजाराने  निधन झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन !

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गुरसाळे (तालुका-पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय ६० वर्षे) यांचे २७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.