
कुडाळ – शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संजय पडते आणि कुडाळच्या माजी सरपंच सौ. पडते यांचा मुलगा देवेंद्र पडते (वय २८ वर्षे) यांचे गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असतांना ९ डिसेंबरला निधन झाले. १० डिसेंबरला त्यांच्या पार्थिवावर कुडाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण कुडाळ बाजारपेठ बंद ठेवून देवेंद्र यांना कुडाळवासियांनी श्रद्धांजली वाहिली.
दोन दिवसांपूर्वी देवेंद्र यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यांना अधिक उपचारांसाठी गोवा येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात वडील, आई, बहीण, काका, काकी आणि चुलत भावंडे, असा परिवार आहे.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह कुडाळवासियांनी देवेंद्र यांचे अंतिम दर्शन घेतले.
ठाकरे गटाच्या ६ खासदारांचा शिवसेनेत प्रवेश !
Maharashtra Monsoon Session : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार
इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री
ठाकरे गटाचे ६ खासदार फुटले : संसदीय दलाच्या बैठकीला अनुपस्थित !
गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार यांचे निधन
Operation Tiger : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार फुटले : शिवसेनेत सहभागी होण्याची शक्यता !