शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मोहन रावले

मुंबई – परळ-लालबाग भागातील शिवसेनेचे लोकप्रिय नेते माजी खासदार मोहन रावले (वय ७२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोवा येथे निधन झाले. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते सलग ५ वेळा निवडून आले. वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत ते खासदार होते. गिरणी कामगारांच्या प्रश्‍नावर त्यांनी संसदेचे काम थांबवले होते. गिरणी कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

मोहन रावले हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जात. साधी रहाणी असलेले सर्वसामान्यांचे नेते अशी त्यांची ओळख होती. काही वर्ष भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सांभाळले. वर्ष २०१३ मध्ये काही मतभेदामुळे त्यांना पक्षातून काढण्यात आले होते; मात्र काही काळानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.