१. अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत नास्तिकतावादी बनलेली असतात. हा राज्यघटनेने हिंदु समाजावर केलेला अन्याय आहे, हे लक्षात घ्या !
२. धर्म एकमात्र अशी गोष्ट असते की, जी व्यक्तीला शिकवते की, शुभकर्म आणि पापकर्म काय आहे ? उचित कर्म काय आहे आणि अनुचित कर्म काय आहे ? नैतिक कर्म काय आणि अनैतिक कर्म काय आहे ? सध्याच्या अधर्मी राज्यव्यवस्थेने गेल्या ७५ वर्षांत हिंदूंना धर्मच शिकवलाच नसल्याने अनेक जण पापाचरण करत आहेत. परिणामी सर्वत्र भ्रष्टाचार अन् अनैतिकता वाढली आहे.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.