अपहार कि जनतेचा विश्वासघात ?

कष्टाने जमा केलेली पुंजी अडचणीच्या काळात उपयोगाला यावी’, या हेतूने सर्वसामान्य नागरिक अधिकोषामध्ये मोठ्या विश्वासाने पैसे ठेवतात. त्यामुळे अधिकोषामधील अपहार हा सर्वसाधारण जनतेचा विश्वासघातच आहे.

कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार ? – किरीट सोमय्या, माजी खासदार

सरकारने ठेवीदारांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असले, तरी ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळेपर्यंत आमचा संघर्ष कायम असेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

हिरे व्यापारी नीरव मोदी यांची मालमत्ता पंजाब नॅशनल बँकेला मिळणार !

नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यांच्यावर वरील अधिकोषाकडून फसवणुकीने पत सुविधा मिळवून १४ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

‘ईडी’कडून माजी आमदार विवेक पाटील यांची २३४ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती जप्त !

कर्नाळा नागरी सहकारी बँक अपहार प्रकरणी १७ ऑगस्ट या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांची तब्बल २३४ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती जप्त केली आहे.

‘बँक ऑफ महाराष्ट्र’कडून वितरित करण्यात आलेले साडेसतरा सहस्र कोटी रुपयांचे कर्ज बुडीत !

एरव्ही कर्ज घेतलेल्या सामान्य खातेदारांनी हप्ते न फेडल्यास त्यांच्या मागे बँकांकडून तगादा लावला जातो. शेवटचा पर्याय म्हणून अशांची संपत्तीही जप्त केली जाते. याउलट ‘श्रीमंत’ थकबाकीदारांना नेहमीच ‘विशेष वागणूक’ दिली जाते !

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला अंमलबजावणी संचालनालयाकडून कोणतीही नोटीस नसून कर्जाची माहिती मागवली आहे ! – सतीश सावंत, अध्यक्ष

कारखाना खरेदी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थेट अगर सहभागातून कोणताही कर्जपुरवठा केलेला नाही.

शिवाजीराव भोसले बँकेचे पुणे येथील ३ शाखा व्यवस्थापक कह्यात !

वर्ष २००७ मध्ये कर्ज मंजुरी देतांना अनियमितता झाली असून या तिघांनीही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कर्ज मंजूर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना कह्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली.

सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई !

महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये २५ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन नंतर परत न करता बुडवले आहे. तसेच नंतर अल्प मुल्यामध्ये साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली आहे.

सहकारातून समृद्धी कुणाची ?

अधिकोषामध्ये घोटाळे झाल्याने सर्वसामान्य ठेवीदारांचे हाल होतात. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात, तर काही ठेवीदार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. त्यामुळे सरकारने घोटाळेबाजांची केवळ संपत्ती जप्त करण्यासह त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.

नगर अर्बन बँकेतील सोनेतारण कर्ज घोटाळा उघडकीस !

तारण ठेवण्यात येणार्‍या वस्तूचे बाजार मूल्य कर्ज देण्याआधी पाहिले जाते. असे असतांनाही बँकेने हे पाहिले नाही, याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरते आहे, असा काढल्यास चुकीचे ते काय ?