तारण ठेवण्यात येणार्या वस्तूचे बाजार मूल्य कर्ज देण्याआधी पाहिले जाते. असे असतांनाही बँकेने हे पाहिले नाही, याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरते आहे, असा काढल्यास चुकीचे ते काय ?
नगर – नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील कर्जदारांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने कर्जदारांनी तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव ठेवला होता; मात्र लिलावापूर्वी तपासणीला प्रारंभ होताच पहिल्या ५ पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी बेन्टेक्सचे नकली सोन्याचे दागिने असल्याचे आढळून आले. यामुळे बँकेत कोट्यवधी रुपयांचा सोने तारण घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या वेळी ३६४ पिशव्या लिलावासाठी आणल्या होत्या. इतर दागिन्यांची ही अशीच परिस्थिती असल्याचा संशय येऊन लिलावात बोली लावण्यासाठी आलेले सराफ निघून गेले. बँकेने याचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया चालू केली आहे. शेवगाव शाखा बनावट सोनेतारण प्रकरणी वर्ष २०१८ मध्येच गुन्हा नोंद होणे आवश्यक होते. एवढी वर्षे टाळाटाळ केल्याने हा विलंब बँक, ठेवीदार आणि सभासद यांच्या हिताला घातक ठरला असल्याचे बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितले.
धक्कादायक! बँकेने लिलावासाठी ठेवलेले सोन्याचे दागिने निघाले बेन्टेक्सचेhttps://t.co/JDqQDs00lT #NagarUrbanBank
— Maharashtra Times (@mataonline) June 23, 2021