अयोध्येतील श्रीराममंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

मंदिर तीन टप्प्यांत बांधले जात असून पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल. पहिल्या टप्प्यात तळमजल्यावरील इतर कामांव्यतिरिक्त ५ मंडपांच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर ७७ कोटी रुपयांचा व्यय (खर्च) करणार !

मंदिराच्या दरवाजाच्या परिसरात टेहळणीसाठी तोंडवळा ओळखणार्‍या ‘फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण मंदिरात ८०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याद्वारे होणार अयोध्येतील श्रीराममंदिरात जलाभिषेक !

श्रीरामजन्मभूमीवर बांधले जात असलेले भव्य श्रीरामंदिर पूर्ण झाल्यानंतर होणार्‍या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी जगभरातील १५५ नद्यांच्या पाण्याद्वारे महाजलाभिषेक करण्यात येणार आहे.

सनातन संस्थेच्या वतीने अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरातील मूर्तीसाठी आणलेल्या शाळीग्राम शिळेचे भावपूर्ण पूजन ! 

अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिरात साडेपाच फूट उंचीची उभ्या मुद्रेतील श्रीरामाची मूर्ती असणार आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी लागणारी शाळीग्राम शिळा नेपाळ येथील गंडकी नदीतून आणण्यात आली.

श्रीराममंदिराच्या तळमजल्याचे ७० टक्के बांधकाम पूर्ण

प्रभु रामचंद्रांच्या दर्शनासाठी, म्हणजे गर्भगृहापर्यंत जाण्यासाठी ३२ पायर्‍या बांधण्यात येणार आहेत. यांपैकी २४ पायर्‍या बांधून पूर्ण झाल्या आहेत.

श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळच्या गंडकी नदीतून शोधण्यात आली शाळिग्राम शिळा !

या शाळिग्राम शिळेवरच भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. शाळिग्राम शिळेद्वारे घडवलेल्या मूर्तीद्वारे सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्‍विक आनंद आणि देवाची कृपा हे ६ लाभ होतात, अशी मान्यता आहे.

अयोध्येत उभारल्या जाणार्‍या राममंदिराचे ‘दुकानदारी’ असे अवमानकारक वर्णन !

प्रशासनात अशा हिंदुविरोधकांचा भरणा असल्यास ते हिंदूहित काय जपणार ?

श्रीराममंदिराच्‍या बांधकामावर आत्‍मघाती आक्रमणाचा कट !

‘जिहादी आतंकवाद नष्‍ट कधी होणार ?’, असा प्रश्‍न प्रत्‍येक भारतियाच्‍या मनात गेली अनेक वर्षे येत आहे. ही समस्‍या सोडवण्‍यासाठी भारताने पाकला नष्‍ट करण्‍यासह देशातील धर्मांधांची जिहादी मानसिकता नष्‍ट करणे आवश्‍यक आहे. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

(म्हणे) ‘द्वेषाच्या भूमीवर राममंदिर बांधले जात आहे !’

जगदानंद सिंह यांनी कधी श्रीरामजन्मभूमीवर धार्मिक द्वेषातून श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आली, त्या विषयी तोंड उघडले आहे का ? या बाबरीची पाठराखण करणारे धर्मांध या देशात अद्यापही असतांना त्यांच्याविषयी कधी तोंड उघडले आहे का ?

(म्हणे) ‘अयोध्येत बांधण्यात येणारे श्रीराममंदिर पाडून बाबरी मशीद उभारू !’

अस्तित्वासाठी धडपडत असलेल्या ‘अल् कायदा’ची धमकी !