श्रीराममंदिराच्‍या बांधकामावर आत्‍मघाती आक्रमणाचा कट !

संकल्पित राममंदिराचे प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – प्रजासत्ताकदिनाच्‍या दिवशी देहलीसह देशातील मोठ्या शहरांमध्‍ये आतंकवादी आक्रमण करण्‍याचा कट रचण्‍यात आल्‍याची माहिती यापूर्वीच समोर आली आहे. आता पाकिस्‍तानी आतंकवादी संघटनांनी अयोध्‍येत श्रीरामजन्‍मभूमीवर चालू असलेल्‍या श्रीराममंदिराच्‍या बांधकामाच्‍या ठिकाणीही आक्रमण करण्‍याचा कट रचल्‍याची माहिती समोर आली आहे. येथे आत्‍मघाती आक्रमण करण्‍याची त्‍यांची योजना आहे. जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने हा कट रचला आहे. यासाठी नेपाळमार्गे आत्‍मघाती आतंकवादी अयोध्‍येत जाण्‍याची शक्‍यता आहे. श्रीराममंदिराचे ७० टक्‍के बांधकाम पूर्ण झाले आहे.

संपादकीय भूमिका 

‘जिहादी आतंकवाद नष्‍ट कधी होणार ?’, असा प्रश्‍न प्रत्‍येक भारतियाच्‍या मनात गेली अनेक वर्षे येत आहे. ही समस्‍या सोडवण्‍यासाठी भारताने पाकला नष्‍ट करण्‍यासह देशातील धर्मांधांची जिहादी मानसिकता नष्‍ट करणे आवश्‍यक आहे. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !