सोलापूर, १८ मार्च (वार्ता.) – अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिरात साडेपाच फूट उंचीची उभ्या मुद्रेतील श्रीरामाची मूर्ती असणार आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी लागणारी शाळीग्राम शिळा नेपाळ येथील गंडकी नदीतून आणण्यात आली. श्रीराममंदिरात लावण्यात येणाऱ्या इतर देवतांसाठी लागणाऱ्या शाळीग्राम शिळा सोलापूरहून पुढे मार्गक्रमण करत असतांना अँबेसेडर हॉटेलजवळ आल्यावर सनातन संस्थेच्या वतीने सौ. उल्का जठार, कु. वर्षा जेवळे आणि अन्य साधक यांनी शिळेची आरती करून दर्शन घेतले. या वेळी शहरातील धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी धर्मप्रेमींनी ‘रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे’, ‘जय श्रीराम’, ‘सियावर रामचंद्र की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.