श्रीराममंदिराच्या तळमजल्याचे ७० टक्के बांधकाम पूर्ण

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिराची काही छायाचित्रे ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांनी प्रसारित केली आहेत.

यात मंदिराचा गाभारा आणि तळमजला दिसत आहे. यासह मंदिराच्या गर्भगृहाचे सर्वच स्तंभ उभे केल्याचे दिसून येत आहेत.

प्रभु रामचंद्रांच्या दर्शनासाठी, म्हणजे गर्भगृहापर्यंत जाण्यासाठी ३२ पायर्‍या बांधण्यात येणार आहेत. यांपैकी २४ पायर्‍या बांधून पूर्ण झाल्या आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार मंदिराचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.