अलीगड (उत्तरप्रदेश) येथे इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना अटक

दिवाळीत करणार होते घातपात !
घातपातावरून अटक करण्यात येणार्‍या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

भारतीय सैन्याधिकार्‍यांच्या भ्रमणभाषमध्ये ‘व्हायरस’ पाठवून संवेदनशील माहिती चोरणार्‍या पाकच्या हेराला अटक !

गुजरात आतंकवादविरोधी पथकाने केली कारवाई !

बांगलादेशी घुसखोरांना भारतात वसवणार्‍या टोळीला अटक

दीड कोटी रुपये जप्त
भारतीय नागरिकत्वाची बनवत होते खोटी कागदपत्रे !

तीन बांगलादेशी महिलांना अटक !

बांगलादेशातून विनापारपत्र वैध कागदपत्रांविना घुसखोरीच्या मार्गाने त्यांनी भारतात प्रवेश केल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

हिंदु आतंकवादाच्या कथित आरोपाखाली अटक करण्यात आलेले गोरक्षक वैभव राऊत यांना जामीन संमत !

हिंदु आतंकवादाच्या कथित आरोपाखाली ऑगस्ट २०१८ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेले ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’चे कार्यकर्ते श्री. वैभव राऊत यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने जामीन संमत केला.

मोशी (पुणे) येथे अवैध वास्‍तव्‍य करणार्‍या ३ बांगलादेशींना अटक !

९ मासांपूर्वी बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्‍याचे उघड !

भारतात अवैधरित्‍या प्रवेश केलेल्‍या ३ बांगलादेशी नागरिकांना नेरूळ येथे अटक

नेरूळ येथे एका झोपडीतून ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांनी अवैधपणे भारतात प्रवेश केला असून यातील दोघांनी १२ वर्षांपूर्वी आपल्‍या पालकांच्‍या समवेत, तर तिसर्‍या आरोपीने ६ वर्षांपूर्वी पतीसमवेत भारतात प्रवेश केला होता.

‘इसिस’ आणि ‘अलसूफा’ यांच्‍या ४ पसार आतंकवाद्यांना पकडण्‍यासाठी ३ लाखांचे बक्षीस !

‘इसिस’ आणि ‘अलसूफा’ या आतंकवादी संघटनांची पाळेमुळे खणून काढण्‍यासाठी राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) अन्‍वेषण चालू केले आहे.

कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्‍यास विरोध !

कुरुलकर यांच्‍या अन्‍वेषणात मिळालेली माहिती आणि ए.टी.एस्.ने न्‍यायालयात सादर केलेली कागदपत्रे मिळावीत असा अर्ज बचाव पक्षाचे अधिवक्‍ता ऋषिकेश गानू यांनी न्‍यायालयात दिला, त्‍याला सरकारी अधिवक्‍ता विजय फरगडे यांनी विरोध दर्शवला.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार्‍या युवतीवर गुन्हा नोंद !

सामाजिक माध्यमाद्वारे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासह हिंदु देवतेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील अल्पसंख्य समाजातील एका युवतीवर गुन्हा नोंद केला आहे.