Pansare Murder Case : माहिती देण्यापेक्षा अन्वेषण काय केले ? ते सांगा !

  • मुंबई उच्च न्यायालयाचे आतंकवादविरोधी पथकावर ताशेरे

  • कॉ. पानसरे हत्या प्रकरण

  • नव्याने अन्वेषण अहवाल सादर करण्यासाठी दिला ३ मासांचा कालावधी

कॉ. पानसरे

मुंबई – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात खटल्याची प्रगती सांगण्यापेक्षा अन्वेषणात काय प्रगती केली ? ते दाखवा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने आतंकवादविरोधी पथकावर ताशेर ओढले. पथकाच्या संथ कारभारावर नापसंती व्यक्त करत पथकाने सादर केलेला अहवालही मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारण्यास नकार दिला. या प्रकरणी न्यायालयाने आतंकवादविरोधी पथकाला नव्याने अन्वेषण अहवाल सादर करण्यासाठी ३ मासांचा कालावधी देत सुनावणी स्थगित केली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या खंडपिठासमोर २१ डिसेंबरला ही सुनावणी झाली.

‘कोल्हापूर सत्र न्यायालयात चालू असलेल्या या खटल्यात आतापर्यंत १७ साक्षीदारांची साक्ष नोंदवून झाली आहे. २ आरोपी पसार असून त्यांचा शोध चालू आहे’, अशी माहिती सरकारी अधिवक्ता मानकुंवर देशमुख यांनी उच्च न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने ‘खटल्यापेक्षा अन्वेषणाची प्रगती जाणून घ्यायची आहे’, असे मत व्यक्त केले.