वर्ष २०२५ मध्ये अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये युद्ध होईल !  

अमेरिकेच्या वायूदलातील जनरलचा दावा

ऐतिहासिक पाऊल !

येत्‍या २६ जानेवारीला असणार्‍या प्रजासत्ताकदिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधानांनी नवा ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. हे लक्षात घेऊन राष्‍ट्राचे सार्वभौमत्‍व आणि अखंडता यांच्‍या रक्षणासाठी भारतियांनीही आता कृतीशील व्‍हायला हवे.

दिग्विजय सिंह यांच्या सर्जिकल स्टॉईकविरोधी विधानापासून काँग्रेसची फारकत !

‘भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या दिग्विजय सिंह यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार ?’, हेही काँग्रेसने जनतेला सांगावे !

अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ मिळवलेल्या सैनिकांची नावे !

केंद्रशासनाकडून अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ मिळवलेल्या सैनिक आणि सैन्याधिकारी यांची नावे देण्यात आली आहेत.

पंजाबमधील सैन्‍य मैदानात सापडले जिवंत बाँब !

पंजाबमध्‍ये यापूर्वी झालेल्‍या हिंसाचारांच्‍या घटनांमागे खलिस्‍तान्‍यांचा हात असल्‍याचे उघड झाले आहे. सरकार याही घटनांचे त्‍या दृष्‍टीने अन्‍वेषण करणार का ?

बलुचिस्तानमध्ये इराणच्या सीमेवरून झालेल्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार

हे आक्रमण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या बलुची लोकांच्या संघटनेकडून करण्यात आल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशन अंतर्गत भारतीय महिला सैनिकांची तुकडी तैनात

यात २ सैन्याधिकारी आणि २५ सैनिक यांचा समावेश आहे.

शिधा आणि शस्त्रे यांच्याविना उणे २५ डिग्री तापमानात लढणे अशक्य !

रशियाच्या सैनिकांची पुतिन यांना व्हिडिओद्वारे विनंती !

भारतीय सैन्य भविष्यातील युद्धासाठी सिद्ध ! – सैन्यदलप्रमुख मनोज पांडे

चीनसमवेतच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील कोणत्याही कृत्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे सिद्ध आहोत. गेल्या वर्षभरात सैन्याने सुरक्षेच्या आव्हानांचा खंबीरपणे सामना केला आहे. सैन्याने स्वतःची क्षमता विकसित करण्यासाठी, तसेच सैन्याची पुनर्रचना आणि प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत.

लढाऊ वृत्ती आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेले भारतीय सैनिक !

ब्रिटिशांनी सैन्यदलाची सर्व सूत्रे हिंदुस्थानचे लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांच्याकडे सुपूर्द केली. स्वतंत्र हिंदुस्थानच्या सैन्यदलाचे पहिले कमांडर म्हणून करिअप्पा यांची नोंद इतिहासात करण्यात आली. हाच दिवस आपण ‘सैन्यदिन’ म्हणून साजरा करतो.