इस्लामाबाद – पाकिस्तानमधील जिहादी आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) २२ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानी सैन्यावर भीषण आक्रमण केले. या आक्रमणात १० सैनिक ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले. पाकच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरिस्तानमधील तिरजा या आदिवासी जिल्ह्यात ही घटना घडली.
पाकिस्तान का फिर बना मज़ाक़?
पाकिस्तानी सेना हो गई बेकार?
पाकिस्तान की सेना पर ज़ोरदार हमला #SauBaatKiEkBaat @KishoreAjwani @imDevu96 pic.twitter.com/eAHQz9LrY9— News18 India (@News18India) August 22, 2023
टीटीपीच्या आतंकवाद्यांनी पाकिस्तानी सुरक्षादलाच्या ताफ्याला लक्ष्य केले. टीटीपीने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर टीटीपी आतंकवाद्यांच्या आक्रमणात वाढ झाली आहे. टीटीपीचे आतंकवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत.
संपादकीय भूमिकापाकने जे पेरले, तेच उगवले ! |