भारतीय सैन्य आता भारतात निर्मित होणारी शस्त्रेच वापरणार !
भारत सरकारने तिन्ही सैन्यदलांना विदेशी बनावटीची शस्त्रे आणि इतर उपकरणे यांपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय सैन्याला लागणार्या संरक्षण उपकरणांची निर्मिती करणार्या आस्थापनांना भारतातच उत्पादन करावे लागणार आहे.