१. पूर्वी कधीही न केलेली कामे ‘सेवा’ म्हणून करतांना आनंद वाटणे
‘मी घरी कधी ‘केर काढणे, स्वतःचे कपडे धुणे’, ही कामे केली नव्हती. रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतांना मला या गोष्टी शिकायला मिळाल्या. आश्रमातील चैतन्यमय वातावरणात या सेवा करतांना मला आनंद वाटत होता.
२. ध्यानमंदिरात नामजप करत असतांना आलेल्या अनुभूती
अ. एकदा मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. तेव्हा माझ्या मनात रामायणातील अनेक प्रसंग येऊन गेले आणि माझी भावजागृती झाली.

आ. ध्यानमंदिरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप करत असतांना ‘त्या छायाचित्रातून चैतन्याचा स्रोत येत आहे’, असे मला जाणवले.
३. एकदा मी आश्रमात भक्तीसत्संग ऐकत होतो. तेव्हा माझ्या तोंडात सतत गोड चव जाणवत होती. एरव्ही घरी असतांना मला तोंडात कडवट चव जाणवते.
४. भावजागृती होणे
अ. ७.५.२०२४ या दिवशी श्रीमती आदिती देवल (आताच्या कै. (श्रीमती) आदिती देवल, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६६ वर्षे) यांनी माझ्या वैयक्तिक त्रासांवर करावयाचा नामजप मला लिहून दिला. ‘त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष श्री गुरूंनी मला नामजप सांगितला आहे’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले.
आ. ‘पुणे येथील सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांनी सांगितल्यामुळे मी रामनाथी आश्रमात सेवेला येऊ शकलो’, असे वाटून माझी भावजागृती झाली.
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून वरील लिखाण करून घेतले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. नीलेश शिंदे, पुणे (१९.५.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |