‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपामुळे निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे
‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते