साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

हा अंक संग्रही ठेवा !

साधकांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चा २ मे २०२१ चा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आपत्काळाविषयीचे अद्वितीय कार्य !’ हा विशेषांक संग्रही ठेवावा. या विशेषांकात परात्पर गुरु डॉ. आठवले आपत्काळाच्या दृष्टीने साधकांना कसे साहाय्य करत आहेत, याविषयीचे लिखाण आहे. ज्या वाचकांना अंक वाचून झाल्यानंतर जमा करावयाचा असेल, त्यांनी तो ‘सनातन प्रभात’च्या वितरकांकडे जमा करावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाढदिवसाच्या विशेषांकांची हाताळणी आणि संग्रह चांगल्या प्रकारे करा !

गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे अनेक मास दैनिकाची छपाई करता आली नव्हती. त्या वेळी सनातनचे ग्रंथ, पूर्वी प्रसिद्ध झालेली ‘सनातन प्रभात’ नियतकालिके यांचाच साधकांना आधार होता. पुढील आपत्काळातही कशी परिस्थिती असेल, याची यावरून कल्पना येते. हे लक्षात घेता यंदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात येणार्‍या रंगीत विशेषांकांची छपाई चांगल्या प्रतीच्या कागदावर करण्यात आली आहे. जेणेकरून आपत्काळाची पुढील काही वर्षे साधकांना तो संग्रही ठेवता येईल. हे विशेषांक हाताळतांना कोणती काळजी घ्यावी, या संदर्भातील काही सूचना येथे देत आहोत.

१. विशेषांक वाचून झाल्यानंतर ते प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावेत.

२. वर्षातून एकदा हा अंक १० मिनिटांसाठी उन्हात ठेवावा. उन्हातून आणल्यानंतर लगेच पिशवीत न ठेवता तो पूर्ण थंड झाल्यानंतरच पिशवीत ठेवावा.

३. या विशेषांकात साधकांची सहज भावजागृती करणारी परात्पर गुरुदेव आणि संत यांची विशेष छायाचित्रे असल्याने त्यांचा वापर आवरण काढणे, इत्यादीसाठी करू नये.

४. अंक संग्रही ठेवतांना त्याच्या अनेक घड्या करू नयेत. घड्यांच्या ठिकाणी कागद लवकर जीर्ण होतो.