महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन
‘बृहदीश्वर’ हे जगातील मोठ्या देवळांपैकी एक देऊळ ! या देवळाचा कळस जगात सर्वांत उंच आहे. अकराव्या शतकात चोळ राजाने हे देऊळ बांधले. पाया न खणताही केवळ शिळांचा (दगडांचा) उपयोग करून जगात सर्वांत उंच उभारलेले हे देऊळ आहे.