‘प्रेमभाव’ या शब्दात असती अक्षरे चार ।
काय हे कोडे करा विचार ।। १ ।।
प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप हो ।
पाहिले कुठे भूवरी सांगा हो ।। २ ।।
असे तो विशाल सागर प्रीतीचा ।
आणि सजीव पुतळा भक्तीचा ।। ३ ।।
चेहरा त्यांचा जणू देवी अंबाबाईचा ।
हास्य त्यांचे करी दूर त्रास (टीप १) सर्वांचा ।। ४ ।।
नथ आणि साडीत त्या दिसती देवीसम ।
आभा आणि प्रकाश त्यांचा कोटी सूर्यासम ।। ५ ।।
उत्तरात दडली आहे सनातन गुरुपरंपरेची शक्ती ।
म्हणती त्यांना सर्व साधक प्रेमाने श्रीचित्शक्ति (टीप २) ।। ६ ।।
प्रेमभावाचे हे कोडे अती सोपे आणि सरळ ।
कारण आमच्या काकू आहेत पुष्कळ प्रेमळ ।। ७ ।।
श्रीसत्शक्ति बिंदाताई यांच्यासंग त्यांचे एकजीव नाते ।
दोघींच्या आश्रये सनातन साधक परिवार वाढे ।। ८ ।।
मुंगी साखरेला लागे, तसे साधक त्यांच्या अवतीभोवती ।
करिती कृती श्री गुरूंच्या मनातले जाणूनी, त्या सत्शिष्या शोभती ।। ९ ।।
नमन आमुचे हे श्रीचित्शक्तिमाते, तुम्ही स्वीकारा ।
सेवा त्यांची करण्या बळ दे आम्हा बाळांना (टीप ३) हे ईश्वरा ।। १० ।।
टीप १ – वाईट शक्तींचा त्रास
टीप २ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
टीप ३ – साधकांना
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (१४.१२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |