श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या ‘सुप्रभात’ या संदेशातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेची साधकाला झालेली जाणीव !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या प्रतिदिन येणार्‍या ‘सुप्रभात’ या भ्रमणभाषवरील संदेशातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेची साधकाला झालेली जाणीव !

मागील अनेक दिवसांपासून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ प्रतिदिन मला न चुकता भ्रमणभाषवर ‘सुप्रभात’ असा संदेश पाठवतात. त्या लवकर उठत असल्याने हा संदेश बर्‍याच वेळा पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान येतो.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पाठवलेला ‘सुप्रभात’ हा संदेश वाचण्यासाठी मन आतुर होऊन हळूहळू लवकर जाग येऊ लागणे

आरंभी मला सकाळी ८.३० वाजता जाग येत असल्यामुळे मी हा संदेश उशिरा पहात असे. त्यानंतर ‘हा संदेश पहावा आणि श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करावे’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. त्यामुळे मी हा संदेश मिळण्याची वाट पाहू लागलो. हळूहळू मला सकाळी ७ च्या सुमारास जाग येऊ लागली. गेल्या आठवडाभरात मला पहाटे ५ ते ६ या कालावधीत जाग येते. त्यामुळे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा संदेश लवकर पाहून मी कृतज्ञतेने त्यांना नमन करतो. हा संदेश गुरुकृपेने मला आध्यात्मिक स्तरावर अनुभवता आला. यासाठी मी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

श्री. सत्यकाम कणगलेकर

२. स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाल्यावर भावजागृती होणे आणि त्यानंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांचा संदेश पाहून आणखी भावजागृती होणे

३०.८.२०२१ या दिवशी मला एका स्वप्नामुळे जाग आली. स्वप्न परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी होते. त्यांना स्वप्नात पाहून मी आधीच गहिवरून गेलो होतो. स्वप्नात त्यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या वेळी मी भावजागृती होऊन रडत होतो. जाग आली, तेव्हा ‘प्रत्यक्षातही माझ्या डोळ्यांतून अश्रू वहात आहेत’, याची मला जाणीव झाली. त्यानंतर मी भ्रमणभाषवर आलेला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा संदेश पाहिला. तो पाहून माझी आणखी भावजागृती होऊ लागली.

३. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा संदेश पाहून ‘गुरुदेवांची कृपादृष्टी साधकांवर कोणत्या ना कोणत्या रूपाने होत असते’, याची जाणीव होणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा संदेश पाहून मला जाणवले, ‘गुरुदेवांनी आम्हा सर्व साधकांना धरून ठेवले आहे आणि काही झाले, तरी ते आम्हाला सोडणार नाहीत.’ त्या वेळी माझ्या मनातील ‘आपल्यावर गुरुदेवांची कृपादृष्टी कोणत्या ना कोणत्या रूपाने होत असते आणि ते सतत आपल्या समवेत आहेत’, ही जाणीव वाढली. ‘जीवनात येणारे सर्व अनुभव आणि अनुभूती ही केवळ त्यांचीच माया, कृपा अन् प्रीती आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘या सगळ्यांतून शिकवून साधनेच्या अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाणारेही गुरुदेवच आहेत आणि त्याची प्रचीतीही ते वेळोवेळी देतच आहेत’, या जाणिवेने माझे मन गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञतेने भरून आले आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. ‘हे गुरुदेव, ‘ही स्थिती अखंड अनुभवता यावी’, यासाठी सेवेच्या माध्यमातून आपल्या चरणांचे अनुसंधान साधता येऊ दे आणि त्या योगे सतत साधनारत रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी आर्त प्रार्थना आहे !

– आपला कृपाभिलाषी,
श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक