शिर्डी येथील ग्रामस्थांचा बेमुदत बंदचा निर्णय मागे !

साई मंदिरात सुरक्षेसाठी सी.आय.एस्.एफ्.ची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या सुरक्षेमुळे ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो. त्यासाठी ग्रामस्थांनी १ मेपासून बेमुदत बंदची हाक दिली होती; मात्र बैठकीनंतर बेमुदत बंदचा निर्णय मागे घेण्यात आला.

धर्मादाय रुग्‍णालयांतील गरिबांसाठीच्‍या राखीव खाटांची माहिती ‘अ‍ॅप’द्वारे मिळणार !

धर्मादाय रुग्‍णालयांमध्‍ये निर्धन आणि आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्‍या जागांपैकी किती खाटा शिल्लक आहेत ?यासाठीचा ‘अ‍ॅप’ प्राधान्‍यक्रमाने सिद्ध करण्‍याचा आदेश आरोग्‍यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिला आहे.

जिवावर बेतलेले ‘अनधिकृत’ होर्डिंग !

कात्रज-देहूरोड (पुणे) बाह्यवळण मार्गावरील किवळे ओव्‍हरब्रीज सर्व्‍हिस रस्‍त्‍यावर वादळी वार्‍यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्‍या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्‍यू झाला. अचानक सोसायट्याचा वारा आल्‍याने किवळे येथे एका बांधकाम साईटवर काम करणारे कामगार एका पंक्चरच्‍या दुकानामध्‍ये आडोशाला थांबले होते.

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३२.३७ टक्के मतदान

या निवडणुकीत ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघातून १ सहस्र ६२१, तर ग्रामपंचायत मतदार संघातून १ सहस्र ७९४ मतदारांनी मतदान केले.

गेल्या वर्षात भारत आणि रशिया यांच्यात ३६३ लाख कोटी रुपयांचा व्यापार !

भारत आणि रशिया यांच्यातील व्यवसाय हा मुख्यत्वे भारताने रशियन तेल मोठ्या प्रमाणात विकत घ्यायला आरंभ केल्याने वाढला. मार्च २०२३ मध्ये भारताने एका दिवसात अधिकाधिक १६ लाख ४० सहस्र बॅरेल तेल विकत घेतले.

तुर्की नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी आलेल्या विमानावर आक्रमण !

सुदानी सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यात संघर्ष होत असून राजधानी खार्टूम शहराला हिंसाचाराने ग्रासले आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा या संघर्षात जीव गेला असून लक्षावधी लोकांना त्यांचे घर सोडून अन्यत्र आश्रय घ्यावा लागला आहे.

१ मे पासून ‘शिर्डी बंद’ची हाक !

न्यायालयाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा देण्यास सिद्धता दर्शवली आहे. यामुळे ग्रामस्थांनी या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने निधी जमावण्यासाठी ग्रामस्थांनी भिक्षा झोळी आंदोलनही केले होते.

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा नोंदवू !

जोपर्यंत बृजभूषण शरर सिंह यांना पदावरून हटवण्यात येत नाही, त्यांना कारागृहात टाकले जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. ही लढाई केवळ गुन्हा नोंदवण्यापुरती नाही. अशा लोकांपासून खेळाला वाचवले पाहिजे.

रशियाने युक्रेनी शहरांवर केलेल्या हवाई आक्रमणांत १३ लोक ठार !

युक्रेनी सैन्याला पाश्‍चिमात्य मित्रराष्ट्रांकडून नवे युद्ध साहित्य मिळाल्यानंतर ‘आम्ही रशियावर आक्रमण करणार’, असा सुतोवाच वोलोदिमिर झेलेंस्की यांनी केला होता. त्यानंतर रशियाने ही आक्रमणे केली.

पालघर साधू हत्याकांडाचे अन्वेषण सीबीआयकडे !

कल्पवृक्ष गिरी उपाख्य चिकणे महाराज आणि सुशील गिरी महाराज हे २ साधू, तसेच वाहनचालक नीलेश तेलगडे हे जमावाच्या आक्रमणाला बळी पडले होते. साधूंच्या हत्याकांडानंतर देशातील संत संतप्त झाले होते.