पोलीस कर्मचार्‍यांनी सेवेत राजकीय दबावाचा वापर करू नये ! – गोवा पोलीस मुख्यालयाची परिपत्रकाद्वारे चेतावणी

राजकीय दबावाचा वापर करणारे पोलीस गुन्ह्यांचे अन्वेषण योग्यरित्या करत असतील का ?

नमाजाच्या आडून हे तर शक्तीप्रदर्शन !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात रस्ते अडवून नमाजपठण करणे, हे धार्मिक नसून शक्तीप्रदर्शनच आहे, असेच हिंदूंना वाटते !

‘बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावा’, असे प्रशासनाला सांगावे का लागते ? त्यांना स्वतःला कळत कसे नाही ?

देवगड तालुक्यातील ‘पडेल कँटीन’ परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे बसवण्याची सूचना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वनविभागाला केली आहे.

बंगालमध्ये मंदिराबाहेर गळफास लावलेला साधूचा सापडला मृतदेह !

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील पुरंदरपूर येथील बेहिरा काली मंदिराबाहेर भुवन बाबा नावाच्या एका साधूचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळलI.

(म्हणे) ‘डोळ्यांत प्रेम असणारा राम सूडबुद्धीने पहात असल्याचे दाखवले जात आहे !’-जितेंद्र आव्हाड

धर्मांधांनी हिंदूंच्या उत्सवांवर आक्रमण करावे आणि हिंदूंनी षंढाप्रमाणे गप्प रहावे, हा आव्हाड यांचा प्रेमभाव असेल, तर त्यांनी तो त्यांच्या धर्मांध बांधवांना शिकवावा !

(म्हणे) ‘मुख्यमंत्री झालो, तर मुसलमानांना पुन्हा ४ टक्के आरक्षण देईन !-काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

‘अमूल दूध खरेदी करू नये’, असा राज्याच्या जनतेला आदेश देईन, असे विधान सिद्धरामय्या यांनी केले. ‘अमूल’ आस्थापनाने राज्यात प्रवेश केल्याने नंदिनी दूध उत्पादनांना आणि त्यावर आधारीत आमच्या शेतकर्‍यांना त्रास होईल’,

बारसू (राजापूर) येथे रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात ‘क्रूड ऑईल’ रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग’ हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

सिंधुदुर्ग : यशवंतगडाजवळ अवैध उत्खनन केल्याच्या प्रकरणी १० जणांना एकूण २६ लाख रुपये दंड !

शिवप्रेमींच्या लढ्याला प्राथमिक यश ! वेंगुर्ला तहसीलदारांची संबंधितांना नोटीस १५ दिवसांत दंड न भरल्यास सक्तीने वसूल करण्याची दिली चेतावणी !

‘जी-२०’ शिखर परिषद : विकासात्मक कार्यगटाच्या तिसर्‍या बैठकीचे गोव्याला वेध

गोव्यात ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या या बैठकीत ‘डिजिटल प्रिन्सिपल्स’, ‘ग्रीन ट्रान्झीशन्स’ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वयक अन् सहयोग वाढवणे या दीर्घकालीन विकासात्मक सूत्रांवर प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे.

आरे परिसरातील अतिक्रमणावर फिरणार बुलडोझर

अतिक्रमण हटवून आरे दुग्ध वसाहत परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ जणांची समिती स्थापन केली आहे.