स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी १५ कोटी निधी संमत !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नाशिकमधील भगूर येथील जन्मस्थानी त्यांच्या जीवनावर आधारित ‘थीम पार्क’ उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून १५ कोटी रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे.

राज्यात राबवला जाणार ‘घर घर संविधान’ कार्यक्रम !

‘घर घर संविधान’ कार्यक्रमा अंतर्गत शाळेच्या प्रार्थनेमध्ये नियमित राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करणे, शाळांना राज्यघटनेच्या प्रती देणे, राज्यघटनेच्या मूल्यांवर आधारित पथनाट्य सिद्ध करणे, विविध स्पर्धा घेणे आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.

महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराचे ‘रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार’ असे नामांतर !

रतन टाटा यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक जडणघडणीमधील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराचे नामांतर ‘रतन टाटा’ यांच्या नावाने केले आहे.

महाराष्ट्राच्या प्रस्तावित उद्योगभवनाला रतन टाटा यांचे नाव !

महाराष्ट्राच्या प्रस्तावित उद्योगभवनाला ‘रतन टाटा उद्योगभवन’ असे नाव देण्याचा निर्णय राज्यशासनाच्या उद्योग विभागाने घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याविषयी घोषणा केली आहे, तसेच १० ऑक्टोबर या दिवशी याविषयीचा शासन आदेशही काढण्यात आला आहे.

NCPCR Chairperson Priyank Kanoongo : मदरशांना सरकारी पैसा देऊ नका, मदरसा बोर्ड विसर्जित करा !

राष्‍ट्रीय बाल अधिकार आयोगाचे अध्‍यक्ष प्रियांक कानूनगो यांचे राज्‍य सरकरांना पत्र

Karnataka Deputy CM DK Shivakumar : कन्‍नड भाषा जाणून घेतल्‍याखेरीज कुणीही कर्नाटकात राहू शकत नाही !

महाराष्‍ट्रात कुणी मराठी शिकणे आणि बोलणे अनिवार्य करण्‍याची मागणी केल्‍यावर त्‍याला संकुचित म्‍हणणारी काँग्रेस आता स्‍वतःच ते करत आहे, हा काँग्रेसचा दुटप्‍पीपणा आहे !

Muslims Threatened Kolkata Durga Puja : बांगलादेशात नव्‍हे, तर कोलकाता येथे मुसलमान मुलांची दुर्गापूजा मंडपात घुसून धमकी !

अजान चालू असल्‍याने ध्‍वनीक्षेपक बंद करण्‍याची धमकी : सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनी दाखवायचा आणि अन्‍यांनी धर्मांधता जोपासायची, अशीच देशातील स्‍थिती आहे. ती पालटण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

KSRTC Increase Dussehra Puja Expenses : कर्नाटक सरकारकडून बसगाड्यांच्‍या दसर्‍याच्‍या पूजेसाठीचे शुल्‍क १०० रुपयांवरून केले २५० रुपये !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हा कर्मचार्‍यांच्‍या तोंडाला पाने पुसण्‍याचा प्रकार आहे. एवढ्या तुटपूंज्‍या रकमेमध्‍ये पूजा साहित्‍य तरी मिळते का ?

मराठी ‘अभिजात’ तर झाली; पण…

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असतांना महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या कामकाजातील मराठी भाषेची स्थिती सुधारण्यास मात्र पुष्कळच वाव आहे.

हरोली (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे पश्‍चिम महाराष्‍ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्‍प कार्यान्‍वित !

राज्‍यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्‍प उभारणीचे काम सध्‍या चालू असून पश्‍चिम महाराष्‍ट्रातील पहिला ३ मेगावॅट क्षमतेचा प्रकल्‍प हरोली (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे अवघ्‍या ६ महिन्‍यात कार्यान्‍वित झाला आहे.