Karnataka Deputy CM DK Shivakumar : कन्‍नड भाषा जाणून घेतल्‍याखेरीज कुणीही कर्नाटकात राहू शकत नाही !

कर्नाटक सरकारचे उपमुख्‍यमंत्री डी.के. शिवकुमार यांची धमकी !

कर्नाटक सरकारचे उपमुख्‍यमंत्री डी.के. शिवकुमार

बेंगळुरू (कर्नाटक) – १ नोव्‍हेंबर हा राज्‍याचा स्‍थापना दिवस आहे. हा कन्‍नडिगांसाठी उत्‍सवाचा दिवस आहे. मी एक नवीन कार्यक्रम बनवला आहे, ज्‍या अंतर्गत माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासह सर्व शाळा आणि महाविद्यालये, कारखाने, व्‍यवसाय यांमध्‍ये या दिवशी कन्‍नड ध्‍वज फडकवावा. हे अनिवार्य असणार आहे. तसेच कन्‍नड जाणून घेतल्‍याखेरीज कर्नाटकात कुणी राहू शकत नाही, हे प्रत्‍येकाने लक्षात घ्‍यायला हवे, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे उपमुख्‍यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केले आहे. ‘बेंगळुरू शहरी भागांत रहाणारे सुमारे ५० टक्‍के लोक इतर राज्‍यांतील आहेत आणि त्‍यांनीही कन्‍नड शिकण्‍यास प्राधान्‍य दिले पाहिजे’, असेही ते म्‍हणाले.

उपमुख्‍यमंत्री शिवकुमार यांनी कन्‍नड समर्थक संघटनांना चेतावणी दिली की, त्‍यांनी हे पाऊल उचलण्‍यासाठी संस्‍था किंवा व्‍यवसाय यांवर दबाव आणण्‍याचा प्रयत्न केल्‍यास त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

महाराष्‍ट्रात कुणी मराठी शिकणे आणि बोलणे अनिवार्य करण्‍याची मागणी केल्‍यावर त्‍याला संकुचित म्‍हणणारी काँग्रेस आता स्‍वतःच ते करत आहे, हा काँग्रेसचा दुटप्‍पीपणा आहे !