नाशिक येथे लाच घेतांना जी.एस्.टी. अधिकार्‍यांसह ४ जणांना अटक ! 

तक्रारदाराचा विज्ञापन चित्रीकरणाचा व्यवसाय असून त्याचे जी.एस्.टी. भरणे बाकी होते. जी.एस्.टी. अधिकारी जगदीश पाटील यांनी ‘चित्रीकरणाची वाहने ‘जी.एस्.टी.’चा दंड न भरता सोडून देतो’, असे सांगत ४० सहस्र रुपयांची लाच मागितली.

भाईंदर येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील लाचखोर मुख्य लिपिक कह्यात ! 

गृहनिर्माण संस्थेला नोटीस बजावणे, व्यवस्थापक नेमणे आणि लेखापरीक्षण करणे यांसाठी भाईंदर येथील उपिनबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक शेख अली हैदर दगडू मिया (वय ३५ वर्षे) याने ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

ठाणे महानगरपालिकेचा लाचखोर लिपिक आणि खासगी व्‍यक्‍ती कह्यात ! 

मुलाचे नाव कर पावतीवर समाविष्‍ट करण्‍यासाठी लाचेची मागणी करत ८ सहस्र ५०० रुपयांची लाच घेतांना ठाणे महानगरपालिकेच्‍या कौसा दिवा उपप्रभाग कार्यालयातील लिपिक गिरीश रतन अहिरे आणि खासगी इसम असीम इनायत शरीफ यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.

विधी आणि न्‍याय विभागाकडून उच्‍च न्‍यायालयात जाण्‍याचा सल्ला; मात्र कार्यवाहीस दिरंगाई !

तत्‍कालीन महाविकास सरकारच्‍या काळात याविषयी ठोस निर्णय घेण्‍यात आला नव्‍हता; मात्र या वेळी महाराष्‍ट्र सदन घोटाळा प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठात्याला लाच घेतांना अटक !

बंगिनवार यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या मुलाच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी प्रतिवर्षाची शासनमान्य विहीत फी २२ लाख ५० सहस्र रुपये व्यतिरिक्त १६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

औंध (सातारा) येथे १ लाखांची लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना रंगेहात पकडले !

औंध (जिल्हा सातारा) येथील पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेेब नारायण जाधव यांना १ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले.

पुणे येथे लिपिकास लाच घेतांना अटक !

तक्रारदार महिला या शासकीय सेवक असून त्‍यांचे १ लाख ७ सहस्र रुपयांचे वैद्यकीय देयक होते. ती रक्‍कम मिळण्‍यासाठी गायकवाड याने लाचेची मागणी केली होती.

गुन्‍हा नोंद न करण्‍यासाठी पोलीस निरीक्षकांनी केली लाचेची मागणी !

सुधारण्‍यासाठी लाच घेणार्‍यांना निलंबित करून तात्‍काळ आणि कठोर शिक्षा करावी !

नाशिक येथे १५ लाखांची लाच घेतांना तहसीलदारांना अटक !

मुरूम उत्‍खननाविषयी पाचपट दंड आणि स्‍वामित्‍व धन जागाभाडे मिळून १ कोटी २५ लाख रुपयांचा दंड अल्‍प करण्‍यासाठी, तसेच स्‍थळ निरीक्षणासाठी १५ लाख रुपयांची लाच घेतांना येथील तहसीलादर नरेशकुमार बहिरम यांना अटक केली.

सोलापूर येथे १५ सहस्र रुपयांची लाच मागणारा पोलीस नाईक अटकेत !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र !
कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक असणार्‍या पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय !