पुणे – तक्रारदाराच्या विरुद्ध असणार्या अर्जाच्या अनुषंगाने गुन्हा नोंद न करण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील वर्ग २ चे पोलीस उपनिरीक्षक शंकर कुंभारे यांनी ५० सहस्र रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ठरलेल्या ३० सहस्र रुपयांपैकी १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना कह्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. कुणीही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी शासकीय काम करण्यास अतिरिक्त रक्कम किंवा लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक नितीन जाधव यांनी केले आहे.
संपादकीय भूमिका
|