‘श्री. सुरेश दाभोळकर यांनी २५.१०.२०२४ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. श्रीमती अनुराधा मळीक (वय ७२ वर्षे) ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग.
१ अ. साधनेची ओढ : ‘दाभोळकरकाका साधनेत येण्यापूर्वी आमच्या घरी माझ्या यजमानांना भेटायला येत असत. तेव्हा माझे यजमान त्यांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचायला देत असत. दाभोळकरकाका भावपूर्णरित्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचत असत. तेव्हापासून त्यांना साधनेची ओढ लागली आणि नंतर ती ओढ वाढत गेली. एकदा ते आमच्या घरी आल्यावर मला म्हणाले, ‘‘आपण सभोवती रहाणार्या व्यक्तींना बोलावून इथे सत्संग चालू करूया.’’ त्याप्रमाणे त्यांनी सर्वांना बोलावून सत्संग चालू केला.
१ आ. नम्र : ते कधीही कुणाला उलट बोलत नाहीत.
१ इ. साधकांना आधार देणे : ते नेहमी साधकांना साहाय्य करतात. काका साधकांवर त्यांच्या कुटुंबियांप्रमाणे प्रीती करतात.
१ ई. काका तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करतात. त्यांची उतारवयातील सेवेची तळमळ पाहून मला सेवा करण्याची प्रेरणा मिळते. मला त्यांच्या समवेत सेवा करतांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात.’
२. सौ. प्रणिता तवटे, म्हापण, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग.
२ अ. सेवाभाव : ‘दाभोळकरकाका प्रत्येक सेवा तत्परतेने, मनापासून आणि आनंदाने करतात.
२ आ. स्वीकारण्याची वृत्ती : काकांच्या जीवनात आतापर्यंत अनेक अडचणी आल्या. काकांनी अडचणींना धीराने तोंड दिले. ते नेहमी परिस्थिती स्वीकारण्याच्या स्थितीत असतात. त्यांच्या मनात प्रतिक्रिया नसतात.’
३. श्री. परेश साटम, ओरोस, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
३ अ. सेवाभाव
१. ‘एखाद्या गावातील एका व्यक्तीने जरी सात्त्विक उत्पादने मागितली, तरीही ती सात्त्विक उत्पादने त्यांना त्वरित मिळावीत’, अशी काकांची तळमळ असते.
२. काका या वयातही सायकलवरून सेवेला येतात. कोणताही वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम असो, काका त्या वेळी ‘सेवा कशी करता येईल ?’, हे पहातात. त्यांचा जनसंपर्क पुष्कळ चांगला आहे. त्याचा त्यांना प्रसारात चांगला उपयोग होतो.
३ आ. साधनेला प्राधान्य देणे : ते पूर्वी सुतारकाम करायचे. त्यांनी अनेक जणांच्या घरांची दारे बनवलेली आहेत. आताही काही जण काकांना विचारतात, ‘‘तुम्ही आता हे काम का करत नाही ?’’ तेव्हा काका त्यांना सांगतात, ‘‘आता मला सेवा आणि साधनाच करायची आहे.’’ काकांनी पैसा कमावण्यापेक्षा साधनेला प्राधान्य दिले आहे.’
४. सौ. क्रांती मिसाळ, ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग.
४ अ. ‘दाभोळकरकाका साधकांशी नेहमी प्रेमाने बोलतात. ते सांगतात, ‘‘मी प्रत्येक साधकामध्ये गुरुदेवांचे रूप पहातो.’’
४ आ. इतरांचा विचार करणे : एकदा प्रसाराची सेवा संपल्यावर सायंकाळी ७.३० वाजता काकांना एक साधक चारचाकी गाडीतून घरी पोचवणार होते. त्या साधकांच्या समवेत असलेल्या एका काकूंना ते मार्गात सोडणार होते. तिथे त्या काकूंचे यजमान त्यांना घ्यायला येणार होते. त्या वेळी काकांनी त्या साधकाला सांगितले, ‘‘आता पुष्कळ काळोख झाला आहे. तुम्ही या काकूंना त्यांच्या घरापर्यंत पोचवा. तुम्हाला उशीर होत असल्यास मला माझ्या घरापर्यंत न पोचवता मुख्य मार्गात पोचवा. नंतर मी चालत जाईन.’’
४ इ. अंतर्मुख : मागील काही मासांपासून ‘काका पुष्कळ अंतर्मुख झाले आहेत. ते सतत ईश्वराच्या अनुसंधानात असतात’, असे मला जाणवते. ते भावपूर्ण सेवा करत असतांना आम्हालाही शिकायला मिळते.
४ ई. सेवाभाव
१. ते ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, दैनिक ‘सनातन प्रभात’चे आधीचे अंक, सनातन पंचांग असे सर्व साहित्य एका मोठ्या पिशवीत ठेवून प्रसारासाठी जातात. ते ती जड पिशवी घेऊन ३ कि.मी. अंतर चालत जातात.
२. काकांच्या घरात कुणीच महिला नाहीत. काकांना प्रसाराला बाहेर पडण्यापूर्वी स्वयंपाक आणि अन्य सर्व कामे करून निघावे लागते, तरीही त्यांच्या चेहर्यावर घरातील कामांचा शीण दिसत नाही. ते कधीही त्या संदर्भात साधकांना बोलून दाखवत नाहीत.’’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १२.१.२०२५)