गुरुकार्याचा प्रसार व्हावा, अशी तळमळ असणारे बाराहाळी (ता. मुखेड, जिल्हा नांदेड) येथील श्री. अरुण महाजन (वय ६९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातनचे उद्योजक साधक श्री. अरुण महाजन (वय ६९ वर्षे) यांच्यातील नम्रता, गुरुकार्याची तीव्र तळमळ, शिकण्याची वृत्ती या गुणांमुळे त्यांनी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे आनंददायी वृत्त ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांनी दिले.

आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श पिता या भूमिका श्रीगुरुदेवांना अपेक्षित अशा सार्थ करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. योगेश व्हनमारे !

‘कै. योगेश हे जेव्हा साधनेत आले तेव्हापासूनच त्यांची प.पू. डॉक्टरांवर एक विलक्षण श्रद्धा होती. ‘आपण एका असामान्य गुरूंच्या चरणांपाशी आलो आहोत आणि आपल्याला येथे स्थिरावयाचे आहे’, हे त्यांना अंतर्मनातून समजलेच होते.

देवद येथील सनातन आश्रमातील श्री. शिवाजी वटकर १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

देवद येथील सनातन आश्रमात सेवा करणारे, तसेच तळमळ, चिकाटी, नम्रता इत्यादी दैवी गुणांद्वारे संतांचे मन जिंकणारे, तीव्र प्रारब्धावर मात करून व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे, राष्ट्र अन् धर्म यांच्या प्रेमापोटी अविरतपणे कार्यरत रहाणारे श्री. शिवाजी वटकर (वय ७२ वर्षे) हे सनातनच्या १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले.

जयपूर (राजस्थान) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मार्गदर्शन

येथे साजर्‍या करण्यात आलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या दैवी प्रवासाच्या निमित्ताने येथे आलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात गुरुपौर्णिमेला उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी उपस्थित साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन केले.

कांदळगाव, मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनच्या साधिका श्रीमती नंदा परब ६१  टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त !

ईश्‍वराशी अनुसंधान राखून आनंदी जीवन जगणार्‍या कांदळगाव येथील श्रीमती नंदा बाळकृष्ण परब (वय ६५ वर्षे) या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्या.

‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेविषयी आश्‍वस्त करणारे एकमेवाद्वितीय द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेसाठी आवश्यक संतांची १०० ही संख्या पूर्ण : सनातनच्या संतांच्या मांदियाळीत १०२ संत विराजमान

पिंपरी (पुणे) येथील सनातन प्रभातच्या वाचक कु. सरस्वतीताई अमृतकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

प्रेमभाव, कुटुंबभाव, सहजता, अगत्यशीलता, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असणारा अनन्य भाव अशा दैवी गुणांनी युक्त असणार्‍या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक कु. सरस्वतीताई अमृतकर या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.

सनातनचे संत, साधक, दैवी बालक, तसेच आध्यात्मिक प्रगती केलेले सनातनचे हितचिंतक आणि समाजातील हिंदुत्वनिष्ठ यांंचा आत्मोन्नतीदर्शक वैशिष्ट्यपूर्ण आढावा पहाण्यासाठी जिल्हासेवकांकडे संपर्क साधा !

गुरुपौर्णिमा २०१९ पर्यंत ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेले सनातनचे दैवी बालक, साधक आणि संत, तसेच सनातनने ओळखलेले त्यांचे नातेवाईक; हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ अन् समाजातील संतरत्ने या सर्वांची सूची गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून पहाता येईल.

दुर्गाष्टमीच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याला श्री महालक्ष्मीदेवीकडून प्रसादरूपी भेट : तीन साधकांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

वारकर्‍यांची पावले पंढरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. ‘कधी एकदा पंढरीच्या विठुरायाचे दर्शन होते’, या ओढीने त्यांचे हृदय व्याकुळ झाले आहे. अगदी त्याचप्रकारे १६ जुलैला असलेल्या गुरुपौर्णिमेची साधक चातकासारखी वाट पहात आहेत.

श्री. गजानन नाखरे (वय ८० वर्षे) आणि त्यांच्या पत्नी सौ. सुमती नाखरे (वय ७५ वर्षे) हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून झाले जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

लांजा तालुक्यातील आगवे गावातील गुणांचा समुच्चय असलेले आणि व्यष्टी स्तरावर प्रयत्न करणारे श्री. गजानन शंकर नाखरे आणि सौ. सुमती गजानन नाखरे हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF