
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याला वंदनीय डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले याही उपस्थित होत्या. ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या अनुग्रहित आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या कृपांकित असणार्या डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी प.पू. भक्तराज महाराज यांची आणि त्यांच्या नंतर त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांचीही सुमारे एक तप सेवा केली आहे. त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना संमोहन क्षेत्रात संशोधन करणे, विविध संतांकडे जाऊन अध्यात्म शिकणे येथपासून प.पू. भक्तराज महाराज यांची पूर्णवेळ सेवा करणे यांसारख्या विविध क्षेत्रांत साथ दिलेली आहे. त्यांच्या या पाठबळामुळेच संस्थेच्या कार्याचा पाया रचला गेला.’ असा परिचय करून देऊन त्यांच्या प्रती सर्व साधकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !