अंगारकी चतुर्थीनिमित्त ‘श्री गणेशयागा’चे आयोजन !

सातारा, २३ जून (वार्ता.) – अंगारकी चतुर्थीनिमित्त २५ जून या दिवशी ‘श्री गणेशयागा’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘उपासनेला दृढ चालवावे’, या समर्थांच्या वचनाप्रमाणे श्री गणेशयागामध्ये भाविकांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री गणेशाची कृपा वृद्धींगत करण्यासाठी, भाविकांच्या कल्याणासाठी आणि संकटमुक्तीसाठी या श्री गणेशयागाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जून या दिवशी शहरातील समर्थ सदन येथे दुपारी ४ वाजता गणेशयाग प्रारंभ होईल. या वेळी महासंकल्प सोडण्यात येणार असून श्री गणपति अथर्वशीर्षाची २१ आवर्तने, जपाभिषेक, होम-हवन होईल. नंतर प्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. तरी समस्त श्री गणेशभक्तांनी यथाशक्ती श्री गणेशयागामध्ये सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.