शूरांचे दैवत स्कंद म्हणजेच खंडोबा !
‘स्कंद या संस्कृत शब्दाचे रूप खंड. त्याचे ममतादर्शक रूप खंडू म्हणजे महाराष्ट्रातील जेजुरी, पाली वगैरे ठिकाणचे खंडोबा मूळचे स्कंद होत. स्कंद म्हणजे कार्तिकस्वामी. स्कंद ही शूर आणि योद्धे यांची देवता म्हणून पुष्कळ पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.