कोल्हापूर येथील दिवाणी न्यायालयाची श्री महालक्ष्मी मंदिरातील सशुल्क ‘ई-पास’ला तात्पुरती स्थगिती !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा विरोध असतांना श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात २०० रुपये आकारून सशुल्क ‘ई-पास’ देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला श्रीपूजक श्री. गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले.

नंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप !

सनातन संस्थेची संस्कार वही विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभावना जागृत ठेवण्यासाठी निश्चित प्रेरणा देत राहील, असा विश्वास या प्रसंगी श्री. अग्रवाल यांनी व्यक्त केला.

महिलेची छेड काढणार्‍या धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद !

शहरातील देहली गेट परिसरात एक विवाहित तरुणी आपल्या मैत्रिणीसमवेत घराबाहेर गप्पा मारत असतांना आरोपी फैजान कलीम बागवान हा त्या विवाहित तरुणीच्या अंगावर दुचाकी गाडी घालून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे हावभाव करून अश्लील शब्द वापरत होता.

उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार !

मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक दसरा मेळाव्याच्या प्रकरणात शिंदे गटाकडून प्रविष्ट करण्यात आलेली हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर करण्याविषयी उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

मुंब्रा (ठाणे) येथील एम्.आय.एम्. पक्षाच्या कार्यालयावर अज्ञातांचे आक्रमण !

येथील एम्.आय.एम्. पक्षाच्या कार्यालयावर १० ते १२ अज्ञातांनी आक्रमण केले असून त्यात दोन जण गंभीर घायाळ झाले आहेत. आक्रमणकर्त्यांनी कार्यालयात घुसून लोखंडी रॉड, तलवारींसह धारदार शस्त्रांनी २ कार्यकर्त्यांवर आक्रमण केले.

राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून मद्याला प्रोत्साहन, तर सामाजिक न्याय विभागाकडून केले जाते व्यसनमुक्तीचे कार्य !

मद्यबंदीविषयी सर्वपक्षीय सरकारांचे दुटप्पी धोरण !

मुंबईला बाँबने उडवण्याची पुन्हा धमकी !

अशा प्रकारे वारंवार धमक्या देऊन कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण करणार्‍या समाजकंटकांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात असल्याचे पुढे येत नसल्याने या गुन्हेगारांना भय राहिलेले नाही. त्यामुळेच गुन्हेगार वारंवार असे गुन्हे करत आहेत !

मद्य प्रोत्साहन विभाग !

‘आज शेतकर्‍यांची दुःस्थिती का निर्माण झाली ?’ वास्तविक सरकारने भारतभरात मद्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेणे सामान्य नागरिकाला अपेक्षित आहे. सरकारी तिजोरीत पैसे आणण्याचे आणि शेतकर्‍यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे मार्ग अनेक आहेत. ते सरकारने चोखाळावेत, अशीच जनतेची अपेक्षा !

रा.स्व. संघाला तमिळनाडूमध्ये मिरवणुकीसाठी अनुमती

रा.स्व. संघ २ ऑक्टोबरला तमिळनाडूमध्ये ५१ ठिकाणी मिरवणुका काढणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाने संघाच्या पदाधिकार्‍यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना काही अटींसह अनुमती दिली.

मादक पेयांचे उत्पादन आणि सेवन प्रतिबंधित करण्याविषयीच्या याचिकेस सर्वाेच्च न्यायालयाचा नकार

देहलीमध्ये मादक पेयांचे उत्पादन, वितरण आणि सेवन प्रतिबंधित किंवा नियमन करण्यासाठी भाजपचे नेते असणारे अधिवक्ता श्री. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला.