रा.स्व. संघाला तमिळनाडूमध्ये मिरवणुकीसाठी अनुमती

चेन्नई – रा.स्व. संघ २ ऑक्टोबरला तमिळनाडूमध्ये ५१ ठिकाणी मिरवणुका काढणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाने संघाच्या पदाधिकार्‍यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना काही अटींसह अनुमती दिली. उच्च न्यायालयाने पोलिसांना मिरवणुकीचा मार्ग निश्चित करण्याचे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडक अटींसह अनुमती देण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघाचा गणवेश परिधान करून मिरवणूक काढण्याची अनुमती मागितली होती. संघाच्या शिवकाशी शाखेचे अधिवक्ता राबू मनोहर यांनी सांगितले की, मिरवणुकीनंतर जाहीर सभा आयोजित केली जाईल. संघाच्या स्थापना दिनासोबतच स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.