मुंबईला बाँबने उडवण्याची पुन्हा धमकी !

मुंबई – ‘मुंबईत बाँबस्फोट घडवून आणू’, असा भ्रमणभाष सांताक्रूझ येथील एका व्यक्तीस आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद   करण्यात आला आहे. एका मासापूर्वी एका पंचतारांकित हॉटेलला बाँबने उडवून देणार्‍याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारे धमकी आल्याने पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध चालू केला आहे.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकारे वारंवार धमक्या देऊन कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण करणार्‍या समाजकंटकांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात असल्याचे पुढे येत नसल्याने या गुन्हेगारांना भय राहिलेले नाही. त्यामुळेच गुन्हेगार वारंवार असे गुन्हे करत आहेत !