विकसित देशांनी कोरोनाच्या काळात विकसनशील देशांना वार्‍यावर सोडले ! – भारताची संयुक्त राष्ट्रांत स्पष्टोक्ती

कोरोनाच्या काळात विकसित देशांनी विकसनशील देशांना वार्‍यावर सोडले होते, अशी स्पष्टोक्ती संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी केली. त्या येथे एका बैठकीत बोलत होत्या.

शाळांचा गणवेश ठरवण्याचा अधिकार नाकारता येणार नाही ! – सर्वाेच्च न्यायालय

कर्नाटकमधील शाळा-महाविद्यालयांतील हिजाब प्रकरण

कुतूबमिनारच्या स्वामित्वाचा अधिकार मिळण्यासंबंधीच्या याचिकेवरील सुनावणीवर उद्या होणार निर्णय !

कुतूबमिनार परिसरात पूजा करण्याचा अधिकार मिळण्याची मागणी करणार्‍या याचिकांमध्ये महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांना पक्षकार बनायचे आहे, असेही त्यांचे अधिवक्ता शर्मा यांनी या वेळी स्पष्ट केले.

पाकिस्तानात बनवण्यात येणार्‍या ‘रूह अफजा’ सरबताला भारतात विक्री करण्याच्या सूचीतून हटवा !

देहली उच्च न्यायालयाचा ॲमेझॉनला आदेश !

उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त समितीच्या वतीने येथील श्री महाकालेश्वर मंदिराचे प्रांगण आणि महाराष्ट्र समाज या ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.

नाशिक येथील भोंगे ७ दिवसांत हटवा, अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू !

मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर म्हणाले की, सणासुदीच्या काळात कर्णकर्कश भोंगे वाजवले गेले, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पोलिसांकडे त्याविरोधात तक्रार केली असून नोंद न घेतल्यास ७ दिवसानंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल.

भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी ५ नेत्यांची नियुक्ती !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी १५ सप्टेंबर या दिवशी भाजपच्या ५ नेत्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे, अशी माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.

हिंदु धर्मावर आक्षेपार्ह टिपणी करणार्‍या ‘ट्विटर’ खात्यावर कारवाई करावी !

‘ट्विटर’वर अनुज पाठक या नावाने खाते चालवणार्‍या व्यक्तीकडून ‘स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर’, तसेच ‘हिंदु धर्म आणि हिंदुत्व’ यांवर सतत आक्षेपार्ह टिपणी केली जाते.

जत तालुक्यातील लवंगा येथे ४ साधूंना मारहाण केल्याचे प्रकरण ! – ७ आरोपींना अटक केलेल्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश !

साधूंना मारहाणप्रकरणी आरोपी असणार्‍या कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्षाला जनतेने निवडणुकीत लक्षात ठेवावे !

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या मौलवीला कर्जत येथून अटक !

पाच ते बारा या वयोगटातील चार अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या एका मौलवीला रायगड जिल्ह्यातील कर्जत येथून अटक करण्यात आली. मौलवीला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.