हिंदु धर्मावर आक्षेपार्ह टिपणी करणार्‍या ‘ट्विटर’ खात्यावर कारवाई करावी !

पुणे – ‘ट्विटर’वर अनुज पाठक या नावाने खाते चालवणार्‍या व्यक्तीकडून ‘स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर’, तसेच ‘हिंदु धर्म आणि हिंदुत्व’ यांवर सतत आक्षेपार्ह टिपणी केली जाते. या व्यक्तींवर कारवाई व्हावी, यासाठी ‘हिंदु उत्सव समिती’, कामशेत शहराच्या वतीने कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगताप यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘हिंदु उत्सव समिती’चे कार्यकर्ते उपस्थित होते.