शाळांचा गणवेश ठरवण्याचा अधिकार नाकारता येणार नाही ! – सर्वाेच्च न्यायालय

कर्नाटकमधील शाळा-महाविद्यालयांतील हिजाब प्रकरण

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

नवी देहली – शाळांना विशिष्ट गणवेश ठरवण्याचा असलेला अधिकार नाकारता येणार नाही, असे निरीक्षण सर्वाेच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कर्नाटकमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालण्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाने लादलेल्या बंदीच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात विविध याचिका प्रविष्ट केल्या आहेत. त्यांवर एकत्रित सुनावणी चालू असतांना न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपिठाने वरील निरीक्षण नोंदवले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ सप्टेंबर या दिवशी होणार आहे.