उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा

उज्जैन (मध्यप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त समितीच्या वतीने येथील श्री महाकालेश्वर मंदिराचे प्रांगण आणि महाराष्ट्र समाज या ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि दर्शनार्थी उपस्थित होते.

हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतांना धर्मप्रेमी हिंदू

या उपक्रमाचा प्रारंभ हरसिद्धी मंदिरापासून करण्यात आला होता. त्यानंतर चामुंडामाता मंदिर, गोपाळ मंदिर, हिंगलाज माता मंदिर, शिवशक्ती गणेश मंडळ आदी ठिकाणी या प्रतिज्ञा घेण्यात आल्या आहेत. यासाठी हरसिद्धी मंदिरामध्ये पंडित अभिजीत जोशी, श्री चामुंडा मंदिरामध्ये पंडित श्री. शरद दुबे आणि श्री. दुष्यंत आर्य, गोपाल मंदिरामध्ये व्यवस्थापक श्री. अजय ढाकणे, तसेच श्री महाकाल मंदिरामध्ये प्रबंधक समितीचे श्री. प्रशांत त्रिपाठी यांनी विशेष सहकार्य केले.