मंचर, चाकण येथील २ मिठाई विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !

स्वीट खव्याचा (गुजरात बर्फी) वापर करून मिठाई बनवत असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी कळवले आहे.

पुण्यातील मानाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी आधी मानाचे ५ गणपति जातील, त्यानंतर लहान गणपति जाणार हे बंधनं का ?, असा प्रश्न अन्य गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आला होता. मानाच्या गणपतींच्या अगोदर छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची अनुमती द्यावी, अशी त्यांची मागणी होती.

यापुढे लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींसाठी कार्य करीन ! – नवनीत राणा, खासदार

आतापर्यंत मी अमरावती येथील लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना, त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करत आले असून यापुढे जिथे जिथे अशा घटना घडतील तेथील कुटुंबांना मी साहाय्य करणार आहे. देशातील लव्ह जिहाद नष्ट करायचा असून त्याचा प्रारंभ जळगावातून होत आहे.

कळंगुट-कांदोळी भागांत मद्यविक्रीची किमान १०० अनधिकृत दुकाने !

ही दुकाने अनधिकृत असल्याने सरकारलाही त्यांच्याकडून कर मिळत नसणार. असे असूनही प्रशासन का कारवाई करत नाही ? प्रशासनातील संबंधित विभागांतील अधिकार्‍यांना या अनधिकृत दुकानांमुळे आर्थिक लाभ होतो का ?

इचलकरंजी येथे विसर्जनासाठी गेलेला युवक पंचगंगेत बुडाला !

आपत्ती व्यवस्थापनाकडून या युवकाचा शोध चालू आहे.

नागपूर शहर तलावात श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनावर निर्बंध घातल्याने मूर्ती विसर्जनाविषयी गणेशोत्सव मंडळांसमोर पेच !

अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल. तथापि येथील महानगरपालिकेने शहरातील सर्वच तलावांमध्ये श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे या वर्षी मूर्तींचे विसर्जन करायचे कुठे ? असा मोठा प्रश्न गणेशोत्सव मंडळांसमोर निर्माण झाला आहे.

अशांना आजन्म कारागृहात डांबा !

आम आदमी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी ‘आता भगवान श्रीकृष्ण आणि भाजप या राक्षसांपासून सर्वांची सुटका करण्यासाठी अरविंद केजरीवाल हे अर्जुनाच्या रूपामध्ये आले आहेत’, असे विधान केले होते.

जगभरातील विचित्र अंधविश्वास

श्रद्धा आणि विश्वास यांत भेद आहे. विश्वास अंध असू शकतो; परंतु श्रद्धा ही डोळस असते. याचे कारण श्रद्धा ही अनुभूतीवर आधारित असते.