इचलकरंजी येथे विसर्जनासाठी गेलेला युवक पंचगंगेत बुडाला !

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथील घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पंचगंगा नदीत गेलेले दोन तरुण बुडाले. यातील एका युवकाला वाचवण्यात पोलिसांना यश आले असून स्वप्नील मारुति पाटील (वय २२ वर्षे) नावाचा युवक पाण्यात बुडाला आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडून या युवकाचा शोध चालू आहे.