यापुढे लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींसाठी कार्य करीन ! – नवनीत राणा, खासदार

अमरावती – आतापर्यंत मी अमरावती येथील लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना, त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करत आले असून यापुढे जिथे जिथे अशा घटना घडतील तेथील कुटुंबांना मी साहाय्य करणार आहे. देशातील लव्ह जिहाद नष्ट करायचा असून त्याचा प्रारंभ जळगावातून होत आहे. ‘आमचे युवक, महिला आणि मुली यांनी नेमके काय केले पाहिजे ?’ याचा संदेश मी त्यांना नक्की देईन, असे वक्तव्य अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केले. त्या आणि त्यांचे पती आमदार रवि राणा हे जळगाव येथील ‘महाराणा प्रताप मित्र मंडळा’च्या वतीने आयोजित ‘सामूहिक हनुमानचालिसा पठण’ कार्यक्रमासाठी जळगावला आले होते. ‘पोलीस कोठडीतील १४ दिवस आम्ही हनुमानचालिसाचे पठण केले’, असेही राणा यांनी या वेळी सांगितले.

संपादकीय भूमिका

असे किती लोकप्रतिनिधी पुढे येऊन म्हणतात ?