संसदीय स्थायी गटाने गोव्यातील समान नागरी कायद्याचे केले पुनरावलोकन !

गोव्यात लागू असलेला समान नागरी कायदा देशात लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘समान नागरी कायदा संपूर्ण देशात लागू झाला पाहिजे आणि यासाठी गोवा हे एक आदर्श राज्य आहे’, असे विधान यापूर्वी केले आहे.

गोवा : धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली ‘पी.एफ्.आय.’चा समर्थक उमरान पठाण कह्यात !

२ धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे लिखाण प्रसारित करून अल्पसंख्यांकांना खुश करून त्यांची मते मिळवणे, ही अल्पसंख्यांक नेत्यांची निवडणूक जिंकण्याची सोपी आणि प्रचलित अशी पद्धत !

शोकांतिका !

‘पूर्वी लाच घेणारा शोधावा लागत असे. आता लाच न घेणारा शोधावा लागतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

समाजविघातक प्रवृत्तींच्या घरावरच नव्हे, तर जिहादी विचारधारेवरही बुलडोझर फिरवावा लागणार ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विहिंप

राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली नृशंस हत्या ही साधारण घटना नसून या देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, राज्यघटना आणि लोकशाही यांवरच आक्रमण आहे.

सामाजिक माध्यमांच्या अतीवापरामुळे ‘फोमो’ (फियर ऑफ मिसिंग आऊट) हा आजार बळावतो !

आपल्या बलस्थानांची, मर्यादांची जाणीव होऊन त्या समजून घेऊन स्वीकारल्यास ‘फोमो’वर मात करता येते, असे समुपदेशक डॉ. शिल्पा तांबे यांनी सांगितले. प्रसिद्धी माध्यमांपासून दूर रहाणे आणि दैनंदिन जीवनात समाधानी रहाणे याने या आजारावर मात करता येते, असे मानसोपचारतज्ञ श्रुती सोमण यांनी सांगितले.

हिंदु राष्ट्र हे मानव, पशू, पक्षी, वृक्ष, वेली यांसह सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांचे हित साधणारे असेल ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

भौतिक विकासासाठी धर्म महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने भौतिक विकासालाच खरा विकास मानला जात आहे. मनुष्यावर जेव्हा कठीण प्रसंग ओढवतो, तेव्हा मानसिक संतुलन नष्ट होते. षड्रिपूंच्या निर्मूलनाचे महत्त्व भौतिक विकासात कुठेही नाही.

संभाजीनगर येथे रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपकावरून भाषण केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ जुलैच्या रात्री १० वाजल्यानंतरही क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ध्वनीक्षेपकावरून भाषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते आनंद कस्तुरे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे

पत्राचाळ आर्थिक अपहाराप्रकरणी ईडीकडून मुंबईत २ ठिकाणी धाडी !

पत्राचाळ आर्थिक अपहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने २ ऑगस्ट या दिवशी दादर आणि कांजूरमार्ग येथे धाडी टाकल्या. या प्रकरणी आणखी काही जणांची चौकशी चालू आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत अटकेत आहेत.

राजभवनाकडे मोर्चा नेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाणे पोलिसांच्या कह्यात !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात ‘राजस्थानी आणि गुजराती नसतील, तर मुंबईत पैसाच रहाणार नाही’, असे म्हटले होते. या विधानावरून राज्यात मोठा गदारोळ झाला.