पत्राचाळ आर्थिक अपहाराप्रकरणी ईडीकडून मुंबईत २ ठिकाणी धाडी !

मुंबई – पत्राचाळ आर्थिक अपहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने २ ऑगस्ट या दिवशी दादर आणि कांजूरमार्ग येथे धाडी टाकल्या. या प्रकरणी आणखी काही जणांची चौकशी चालू आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत अटकेत आहेत. न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी दिली आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून संजय राऊत यांच्या निकटवर्तियांची चौकशी चालू आहे.